Thursday, November 8, 2018

What is Patience?

What is Patience? 
संयम काय आहे?

 संयम काय आहे? संयम एक ज्वलंत ज्वाला आहे. संयम म्हणजे एक वाहणाऱ्या धारेला थांबवणे आहे. संयम म्हणजे विचाराची एक अशी लहर आहे जिला थांबवणे थोडे कठीणच असते. संयम हा एक म्हणजे आपल्या मनावर आपण ताबा ठेवणे आणि एक कठीण परीक्षा पुर्ण करणे होय. हि एक अशी वस्तु आहे जिला आपण अमृत किंवा विषाचा प्यालासुद्धा बोलू शकतो.अमृत अशा कारणांनी की जो संयम ठेवतो त्याला अंतिमतः विजय सुद्धा मिळतो,आणि जो संयम ठेवू शकत नाही त्याचा पराजय सुद्धा होऊ शकतो.
   संयम सुटला तर खूप अनर्थ होऊ शकतात. पण जर संयम असेल तर खूप काही भेटू शकते. कारण प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यायला लागतो आपल्याला हवे तसे होत नाही दर वेळी आयुष्यात. म्हणुन संयम हा जरूरी आहे. आपण उदाहरण घेतले एखाद्या बी मधून रोपटे बनायला त्याला जेवढा वेळ हवे तेवढा वेळ त्याला दिला पाहिजे. फळ पिकायला त्याला जेवढा वेळ हवे तेवढा वेळ त्याला दिलाच पाहिजे. संयम हा माणसाला आयुष्य जगायला शिकवतो,आयुष्यातील  अडचणींवर कसे मात करायचे शिकवतो. संयम हा माणसामध्ये धीटपणा,चिकाटी, जिद्द,सोशिकपणा, सहनशीलता वाढवतो.या सर्व गोषटींमुळे माणूस एक यशदायी जीवन जगू शकतो. म्हणून संयम पाळा यश मिळवा.

4 comments:

What is Patience?

What is Patience?  संयम काय आहे?  संयम काय आहे? संयम एक ज्वलंत ज्वाला आहे. संयम म्हणजे एक वाहणाऱ्या धारेला थांबवणे आहे. संयम म्हणजे ...