Sunday, November 4, 2018

How to control your Anger?

How to control your Anger?
स्वतःच्या रागाला शांत कसे कराल?

 राग कोणाला नाही येत असा कोणीच नाही पृथ्वीवर, प्रत्येकाला राग येतो पण तो राग शांत कसे करावे हे येत नाही लोकांना. खर बोललो तर राग हा येणे चांगले पण आणि वाईट पण. परंतु आपण आलेल्या रागाचा उपयोग कोणत्या गोष्टी साठी करतो हे महत्वाचे.रागाला शांत करण्याचे उपाय तर खूप आहेत पण तो राग तात्पुरता शांत होतो आणि जर तो राग कायमचा घालवायचा असेल तर त्याच्यासाठी आपले विचार आपल्याला बदलायला लागतील.
 आता तुम्ही बोलाल राग तात्पुरता कसा घालवायचा? तर राग येत असेल तर आपले आवडते गाणे आठवायचे, आपला आवडता क्षण आठवायचा, आणि नेहमी प्रमाणे अंक उलटे बोलायचे आणि त्याने सुद्धा राग शांत होत नसेल तर पाढे उलटे बोलायचे.याने तरी थोड लक्ष विचलीत होईल असे मला वाटते. राग आता कायमचा घालवायचा असेल तर आयुष्यातील आपले लक्ष म्हणजे आपले आयुष्यातील जे काही करायची इच्छा असेल त्याचा विचार करा आणि सर्व राग तिथे काढा. जो पर्यंत आपले लक्ष पुर्ण नाही होत तोपर्यंत शांत बसून चालणार नाही.
जर तुम्ही आपला राग योग्य ठिकाणी वापरला तर जगातील कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो . राग शांत करने हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. इतर कोणीही सांगितले तरी त्याचा उपयोग होणार नाही.माझे असे बोलणे नाही की कधी रागवू नका पण जिथे गरज आहे तिथेच रागवा. म्हणजे तुम्ही बोलाल तुम्ही सांगितले रागवू नका.तुमच्या  मुलाने शाळेतून एका मुलाचे पेन चोरून आणले  तर त्याला रागवल तर पाहिजे पण त्या रागात पण फरक असला पाहिजे नाहीतर तुम्ही बोलाल चलता है बेटा लेकीन अगली बार मत करना तर तो काय ऐकणार असे होईल अशी शक्यता थोडी कमीच आहे. हा एक चेष्टेचा भाग झाला पण महत्वाचे म्हणजे आपल्या रागाला आपली शक्ती बनवा आणि त्या शक्तीचा उपयोग योग्य त्या ठिकाणी करून चांगले कार्य करा.

1 comment:

What is Patience?

What is Patience?  संयम काय आहे?  संयम काय आहे? संयम एक ज्वलंत ज्वाला आहे. संयम म्हणजे एक वाहणाऱ्या धारेला थांबवणे आहे. संयम म्हणजे ...