Thursday, November 8, 2018

What is Patience?

What is Patience? 
संयम काय आहे?

 संयम काय आहे? संयम एक ज्वलंत ज्वाला आहे. संयम म्हणजे एक वाहणाऱ्या धारेला थांबवणे आहे. संयम म्हणजे विचाराची एक अशी लहर आहे जिला थांबवणे थोडे कठीणच असते. संयम हा एक म्हणजे आपल्या मनावर आपण ताबा ठेवणे आणि एक कठीण परीक्षा पुर्ण करणे होय. हि एक अशी वस्तु आहे जिला आपण अमृत किंवा विषाचा प्यालासुद्धा बोलू शकतो.अमृत अशा कारणांनी की जो संयम ठेवतो त्याला अंतिमतः विजय सुद्धा मिळतो,आणि जो संयम ठेवू शकत नाही त्याचा पराजय सुद्धा होऊ शकतो.
   संयम सुटला तर खूप अनर्थ होऊ शकतात. पण जर संयम असेल तर खूप काही भेटू शकते. कारण प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यायला लागतो आपल्याला हवे तसे होत नाही दर वेळी आयुष्यात. म्हणुन संयम हा जरूरी आहे. आपण उदाहरण घेतले एखाद्या बी मधून रोपटे बनायला त्याला जेवढा वेळ हवे तेवढा वेळ त्याला दिला पाहिजे. फळ पिकायला त्याला जेवढा वेळ हवे तेवढा वेळ त्याला दिलाच पाहिजे. संयम हा माणसाला आयुष्य जगायला शिकवतो,आयुष्यातील  अडचणींवर कसे मात करायचे शिकवतो. संयम हा माणसामध्ये धीटपणा,चिकाटी, जिद्द,सोशिकपणा, सहनशीलता वाढवतो.या सर्व गोषटींमुळे माणूस एक यशदायी जीवन जगू शकतो. म्हणून संयम पाळा यश मिळवा.

Monday, November 5, 2018

What is Success?

What is Success?

   What is Success? यश काय आहे? एखादी गोष्ट, लक्ष्य जे आपण ठरवलेले असते ते पुर्ण होणे, का ज्या गोष्टीतूनआपल्याला  आनंद भेटतो ती गोष्ट म्हणजे यश नक्की काय आहे? याचा विचार आपण थोडा वेगळा करून बघितला तर समजेल नक्की यश काय आहे त्याचा उद्देश काय आहे? वरवर मिळालेलं यश किंवा विजय हे यश असु शकत नाही हे आपल्याला समजले पाहिजे.
  यश हे परिपूर्ण हवे जे मिळाल्याने आत्मसमाधन होईल. ज्यामुळे आपल्याला आनंद तर होईल आणि एक वेगळा अनुभव सुद्धा मिळेल. छोट्या छोट्या विजयानी  आपली स्वप्न बघण्याची आंतरिक शक्ती वाढते. एकदा आत्मविश्वास वाढला की सर्व शक्ती वाढते. एक एक पायरी चढत गेलो की आपण हवे त्या ठिकाणी पोहचू शकतो. अपयश जरी येत असेल तरी त्याला तोंड देणे हे आपले काम आहे आणि त्यांना एकदा तोंड द्यायला शिकलात की आयुष्य सुंदर होते.Faddybook.blogspot.com

Sunday, November 4, 2018

How to control your Anger?

How to control your Anger?
स्वतःच्या रागाला शांत कसे कराल?

 राग कोणाला नाही येत असा कोणीच नाही पृथ्वीवर, प्रत्येकाला राग येतो पण तो राग शांत कसे करावे हे येत नाही लोकांना. खर बोललो तर राग हा येणे चांगले पण आणि वाईट पण. परंतु आपण आलेल्या रागाचा उपयोग कोणत्या गोष्टी साठी करतो हे महत्वाचे.रागाला शांत करण्याचे उपाय तर खूप आहेत पण तो राग तात्पुरता शांत होतो आणि जर तो राग कायमचा घालवायचा असेल तर त्याच्यासाठी आपले विचार आपल्याला बदलायला लागतील.
 आता तुम्ही बोलाल राग तात्पुरता कसा घालवायचा? तर राग येत असेल तर आपले आवडते गाणे आठवायचे, आपला आवडता क्षण आठवायचा, आणि नेहमी प्रमाणे अंक उलटे बोलायचे आणि त्याने सुद्धा राग शांत होत नसेल तर पाढे उलटे बोलायचे.याने तरी थोड लक्ष विचलीत होईल असे मला वाटते. राग आता कायमचा घालवायचा असेल तर आयुष्यातील आपले लक्ष म्हणजे आपले आयुष्यातील जे काही करायची इच्छा असेल त्याचा विचार करा आणि सर्व राग तिथे काढा. जो पर्यंत आपले लक्ष पुर्ण नाही होत तोपर्यंत शांत बसून चालणार नाही.
जर तुम्ही आपला राग योग्य ठिकाणी वापरला तर जगातील कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो . राग शांत करने हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. इतर कोणीही सांगितले तरी त्याचा उपयोग होणार नाही.माझे असे बोलणे नाही की कधी रागवू नका पण जिथे गरज आहे तिथेच रागवा. म्हणजे तुम्ही बोलाल तुम्ही सांगितले रागवू नका.तुमच्या  मुलाने शाळेतून एका मुलाचे पेन चोरून आणले  तर त्याला रागवल तर पाहिजे पण त्या रागात पण फरक असला पाहिजे नाहीतर तुम्ही बोलाल चलता है बेटा लेकीन अगली बार मत करना तर तो काय ऐकणार असे होईल अशी शक्यता थोडी कमीच आहे. हा एक चेष्टेचा भाग झाला पण महत्वाचे म्हणजे आपल्या रागाला आपली शक्ती बनवा आणि त्या शक्तीचा उपयोग योग्य त्या ठिकाणी करून चांगले कार्य करा.

Saturday, November 3, 2018

Positive & Negative thoughts


Positive & Negative thoughts

चांगले आणि वाईट विचार

   चांगले आणि वाईट विचार हे सतत माणसाच्या मनामध्ये येत असतात त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे हे बहुदा लोकांना माहिती नसत का त्याचा विचार ते करत नाही. नेहमी माणूस विचार करतो की माझे सर्व चांगले छान असे जीवन गेले पाहिजे दुःख नको यायला माझ्या आयुष्यात. पण हा विचार करणे तो ज्या दिवशी सोडेल त्याच दिवशी त्याच्या जीवनात आनंद येईल.माणसाने नेहमी चांगला विचार करणे शक्य तर नाही पण तो जर वाईट काळात त्याने चांगला विचार केला तर हे शक्य आहे.वाईट विचार म्हणजे काय आपण नेहमी दुसऱ्या बाजूने म्हणजे चुकीचा विचार करतो, पण जर आपण वाईट विचार करत असलो तरी त्याने त्या विचारात चांगला विचार केला तर कोणताच विचार आपले काम अडवू शकत नाही.
   चांगले विचार म्हणजे आपण होय हे शक्य आहे असा विचार करणे, पण त्यामध्ये अतिविश्र्वस नको. समजा एक गरीब व्यक्ती आहे त्याच्याकडे रोज त्याला खायला १ पोळी मिळते,आणि  एक अंधभिकारीआहे त्याला खायला काही नाही मिळत तर पहिल्या व्यक्तीने विचार केला पाहिजे देवाने मला धडधाकट शरीर दिले आहे आणि जेवण ही दिले आहे. असा एक चांगला विचार आणला पाहिजे आणि त्याहून चांगला विचार त्याने त्या अंधभिकर्याची मदत केली पाहिजे.आणि  जर प्रत्येक गोष्टीत जर तुम्हाला आनंद शोधता आला की चांगले विचार येत राहतील वाईट विचार नष्ट होतील.
अच्छा सोचो अच्छा होगा अच्छा करो अच्छा मिलेगा.

Life, आयुष्य, जिंदगी.

Life, आयुष्य, जिंदगी.

  Life, आयुष्य, जिंदगी, हे शब्द वेगवेगळे पण अर्थ एकच. सर्वांना आयुष्यात काही तरी वेगळे करायचे असते पण सर्व जण संधी शोधत असतात. आणि ती संधी कोठून येईल ते सांगता येत नाही पण त्या साठी आपण जागरूक असणे गरजेचे असते.
  समजा कधी अपयश आले तर हार मानायची नसते,आणि  अपयशाने खचून जायच नसते. आयुष्य हे फार सुंदर आहे, आणि ते सुंदर बनवायचे असेल तर रडत बसून काही होणार नाही.आता  प्रत्येक जण हेच सांगतो असे तुम्ही बोलाल पण हे सांगितल्याशिवाय माणूस  या विचारातून बाहेर पडत नाही. जय मिळवायचा असेल तर संघर्ष करावा लागतो शेवटच्या श्वसापर्यंत.जो  संघर्ष करतो तोच विजय संपादन करतो.
 जर जग जिंकण्याचा विचार असेल तर संकटाशी दोन हात करावेच लागणार. जिद्द, चिकाटी असेल तर आपण हवे ते मिळवू शकतो हे कोणी सांगायची गरज नाही लागणार तुम्हाला. तसाबोलतात  घर बांधायला कमी वेळ लागतो पण राजमहाल बांधायला थोडा उशीरच लागतो.

Thoughts

Thoughts
  1. One best book is equal to a hundred good friends, but one good friend is equal to library.
  2. We have no ability to be equal to all have opportunities equal to their ability lane.
  3. You have to dream before the dreams come true.
  4. You cannot change your future,but, you can change your habits, and surely your habits will change your future.

What is Patience?

What is Patience?  संयम काय आहे?  संयम काय आहे? संयम एक ज्वलंत ज्वाला आहे. संयम म्हणजे एक वाहणाऱ्या धारेला थांबवणे आहे. संयम म्हणजे ...