Saturday, November 3, 2018

Life, आयुष्य, जिंदगी.

Life, आयुष्य, जिंदगी.

  Life, आयुष्य, जिंदगी, हे शब्द वेगवेगळे पण अर्थ एकच. सर्वांना आयुष्यात काही तरी वेगळे करायचे असते पण सर्व जण संधी शोधत असतात. आणि ती संधी कोठून येईल ते सांगता येत नाही पण त्या साठी आपण जागरूक असणे गरजेचे असते.
  समजा कधी अपयश आले तर हार मानायची नसते,आणि  अपयशाने खचून जायच नसते. आयुष्य हे फार सुंदर आहे, आणि ते सुंदर बनवायचे असेल तर रडत बसून काही होणार नाही.आता  प्रत्येक जण हेच सांगतो असे तुम्ही बोलाल पण हे सांगितल्याशिवाय माणूस  या विचारातून बाहेर पडत नाही. जय मिळवायचा असेल तर संघर्ष करावा लागतो शेवटच्या श्वसापर्यंत.जो  संघर्ष करतो तोच विजय संपादन करतो.
 जर जग जिंकण्याचा विचार असेल तर संकटाशी दोन हात करावेच लागणार. जिद्द, चिकाटी असेल तर आपण हवे ते मिळवू शकतो हे कोणी सांगायची गरज नाही लागणार तुम्हाला. तसाबोलतात  घर बांधायला कमी वेळ लागतो पण राजमहाल बांधायला थोडा उशीरच लागतो.

1 comment:

What is Patience?

What is Patience?  संयम काय आहे?  संयम काय आहे? संयम एक ज्वलंत ज्वाला आहे. संयम म्हणजे एक वाहणाऱ्या धारेला थांबवणे आहे. संयम म्हणजे ...